कोकणानंतर मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, राज्यातही मान्सून सक्रिय होणार
मुंबई, दि. 10 - कोकणात मान्सूननं वर्दी दिल्यानंतर आता मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार बॅटिंग सुरु केली आहे. सलग दुसर्या दिवशी पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस झाला. कांदिवली, मालाड, दहिसर, मिरारोड या भागात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.
दक्षिण व मध्य मुंबईमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरणात सुखद गारवा अनुभवायला मिळाला. पुढच्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे धुळे-सूरत आणि नागपूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. महिर फाट्याजवळ जोरदार पावसामुळं नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्ताच वाहून गेला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.