Breaking News

नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुुरु होणार

नवी मुंबई, दि. 25 - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नच्या पाठपुराव्याला यश आले असून नवी मुंबई आणि परिसरासाठी स्वतंत्र पासपोर्ट  कार्यालय सुरु करण्याची त्यांची मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मान्य केली आहे. 17 जून 2017 रोजी डॉ.नाईक यांना मंत्री स्वराज यांनी पाठविलेल्या लेखी  पत्रात नवी मुंबईसाठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र खोलणार असल्याची माहिती दिली आहे.
झपाटयाने विकसीत होणारे 21व्या शतकातील नवी मुंबई महानगराची लोकसंख्या 15 लाखांच्यावर गेली आहे. नवी मुंबई लगत पनवेल, खारघर आणि उरणची  लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे. हा सर्व भाग मिळून 25 लाखांच्या लोकसंख्येचा आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट  कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज  यांच्याकडे लेखी पत्र पाठवून 23 मार्च 2017 रोजी केली होती. त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व विदेश मंत्री सुषमा स्वराज हयांनी पासपोर्ट योजनेच्या  दुसर्या टप्पयात नवी मुंबईला एक स्वतंत्र पोस्ट आँफीस पासपोर्ट सेवा केंद्र(झजझडघ) लवकरच सुरू करणार असल्याची माहिती स्वराज यांनी लेखी पत्राद्वारे  डॉ.नाईक यांना दिली आहे.
नवी मुंबईतील नागरिकांसाठी सध्याचे पासपोर्ट कार्यालय ठाणे शहरातील वागळे इस्टेट या भागात आहे. नवी मुंबई, पनवेल, खारघर, उरण इत्यादी परिसरातील  नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी किंवा पासपोर्ट विषयक इतर कामे करण्यासाठी 15 ते 50 किलोमिटरचा प्रवास करुन ठाणे येथे जावे लागत होते. त्यामध्ये त्यांचा  वेळ आणि पैसाही वाया जातो. नवी मुंबईत मोठी औद्योगिक वसाहत आहे मोठ-मोठी आय.टी. पार्क आहेत. हॉटेल व्यवसाय वाढला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाची  क्रीडा संकुंले आहेत शैक्षणिक केंद्र म्हणून नवी मुंबईचा लौकीक आहे. विद्यापिठे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था, विविध विषयातील महाविद्यालये येथे आहेत. नवी  मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु झाले आहे. जेएनपीटी येथे चौथ्या पोर्टचे निर्माण होेते आहे. मोनो, मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. अनेक उद्योगपती,  व्यापारी, विद्यार्थी आणि सर्व स्तरातील नागरिकांना पासपोर्टची गरज लागते, अशावेळेस त्यांना ठाणे येथे जावे लागते. ठाण्यातील पासपोर्ट कार्यालयात अपुर्या  कर्मचारी वर्गामुळे कामाचा ताण भरपूर पडत होता परिणामी पासपोर्ट मिळण्यास उशिर होत होता. हेच लक्षात घेऊन डॉ. नाईक यांनी नवी मुंबईत जर स्वतंत्र पासपोर्ट  कार्यालय सुरु झाले तर नवी मुंबई, पनवेल, खारघर आणि उरण परिसरातील नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचेल तसेच त्यांना जलदगतीने पासपोर्ट देणे शक्य  होणार आहे, असे आपल्या मागणीपत्रात म्हंटले होते. त्यांच्या हया मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे नवी मुंबई व आसपासच्या जनतेमध्ये आनंदाचे  वातावरण निर्माण झाले आहे.
स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयामुळे नवी मुंबईसह पनवेल, खारघर, उरण या भागांतील नागरिकांना जवळच पासपोर्ट काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यांना  पासपोर्टसाठी लांबचा प्रवास करुन ठाणे येथे जावे लागणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे, याचे मला समाधान आहे.