बोरी तलावात हजारो मासे मृत्यूमुखी
अकोले, दि. 08 - कोतुळ, बोरी, भोळेवाडी या गावांना पाणीपुरवठा करणार्या व आसपासच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर फिलिंग सेंटर असलेल्या बोरी तलावात हजारो मासे मृत झाल्याने पिण्याच्या पाण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
बोरी तलावाची साठवण क्षमता 47.78 दलघनफूट असून सध्या तलावात 19.50 दलघनफूट म्हणजे चाळीस टक्के पाणी साठा असून या तलावात सुमारे बारा हजार लोकसंख्या असलेले कोतुळ, बोरी, भोळेवाडी या गावांना या तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. तर आसपासच्या टंचाईग्रस्त ग्रस्त मन्याळे, पिसेवाडी, सह अनेक गावांमध्ये टँकर द्वारे याच तलावातून पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या आठ दहा दिवसां पासून या तलावातील मासे मृत होत आहेत तलावाच्या सुमारे एक किलोमीटर परीघ क्षेत्रात हजारो मासे मृत होवून कुजलेल्या अवस्थेत आहेत. त्याची दुर्गंधी परिसरात सुटली आहे. त्यावर कावळे, कुत्रे ताव मारण्यासाठी येतात मात्र मृत मासे थोडे दूरवर नेवून टाकून देतात. हे पक्षी, प्राणी या मृत माश्यांना खात नाहीत.
मागील वर्षी मे महिन्यात हा तलाव पुर्ण आटला होता. त्यामुळे यात एकही मासा शिल्लक राहिला नव्हता मात्र जुलै, ऑगस्ट मध्ये तलाव भरल्याने त्यात रावस, कटला, खवल्या आदी जातीचे मत्स्य बीज सोडण्यात आले. मच्छिमार या तलावात मासेमारी करतात. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असुन मासे एक दोन किलो वजनाचे झाले आहेत. पाणी जास्त असल्याने उन्हामुळे मासे मरणे शक्य नाही असे जाणकारांचे मत आहे. मात्र मासे मृत झाल्याने पिण्याच्या पाण्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कानाडोळा का केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.