चीनमध्ये भूस्खलनात 100 पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता
बीजिंग, दि. 25 - चीनमधील सिच्युआन प्रांतातील मॅक्सियन काऊंटी येथे झालेल्या भूस्खलनात सुमारे 100 पेक्षा अधिक जण गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेत किमान 40 घरे उद्धवस्त झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर बचाव पथकाने त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर बचाव पथकाने त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.