Breaking News

खा.प्रतापराव जाधव यांनी महावितरणाच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर!

बुलडाणा, दि. 27 - निधी मिळूनही दुरुस्तीसह नव्या कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, कृषीपंपाच्या कनेक्शनसाठी शेतकर्‍यांना होणारा मनस्ताप यासह विविध  समस्यांचा आढावा खा.प्रतापराव जाधव यांनी घेत महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत चांगलीच कानउघडणी केली. जिल्हास्तरीय विद्युत समितीची आढावा  बैठक 25 मे राजी महावितरण कार्यालयाच्या सभागृहात खा.प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाारातून तक्रारी घेवून आलेल्या शेतकरी व विज  ग्राहकांमुळे या आढावा बैठकीला जनता दरबाराचे स्वरुपच प्राप्त झाले होते. यावेळी आ.डॉ.संजय रायमुलकर, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख  जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, विद्युत समितीचे बबनराव तुपे, माजी जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, महावितरणाचे अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे,  बुलडाणा कार्यकारी अभियंता विजय झिझीलवार, मलकापूर कार्यकारी अभियंता पवार, खामगाव कार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती.
यावेळी शेतकर्‍यांनी महावितरणाच्या संदर्ाातील तक्रारींचा पाढाच खा.प्रतापराव जाधव यांच्यासमोर वाचला. या तक्रारींचे ऑनस्पॉट निराकरण करत खा.जाधव यांनी  यंत्रणेला मार्गदर्शक सुचना केल्या. ते म्हणाले मुख्यमंत्री व उर्जामंत्र्याच्या घोषणेनुसार कृषीसाठी 12 तास विज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या आठ तास  जेमतेम पुरवठा होतो. खरिप हंगाम तोंडावर आहे. त्यातच थकबाकीसाठी महावितरण सक्ती करत आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या शेतमालाचे ााव पडले असुन शेतकरी  तुरीमुळे चिंतातुर झाला आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत महावितरणने विजपुरवठा करावा नंतरच शेतकर्‍यांकडे थकबाकीसाठी जावे. शिवाय ज्या शेतकर्‍यांनी कृषीपंपाचे  पैसे ारले आहे त्यांना पेरणीपुर्व तात्काळ कनेक्शन द्यावे, तसेच कृषीपंपाच्या जोडणीसाठी टेंडर प्रक्रियेला विलंब न करता ज्या कंत्राटदारांनी रोहित्र बसविले आहे.  त्यातील वॉरंटी पिरीयड मधील रोहित्राच्या प्रमाणात 10 टक्के जास्तीचे रोहित्र राखीव ठेवावेत. जेणेकरुन जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास ते तात्काळ बदलून नवे  उपलब्ध करुन देता येईल. दोन ते तीन वर्षापासून इन्फ्रामधील झालेल्या कामात काही ठिकाणी पोल वाकले आहेत. सिमेंट पोलला तडा गेलेले आहेत तर तारा देखील  तुटल्या आहेत. या कामांचा जे.ई.कडून अहवाल घ्यावा आणि दुरुस्तीसह दोषींवर कारवाई व्हावी, अशा सुचनाही खा. जाधव यांनी यावेळी दिल्या. या प्रसंगी अधिक्षक  अिायंता कडाळे यांनी अधिनिस्त अधिकारी व कर्मचार्‍यांना कामाच्या तत्परतेबाबत सुचना करत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. यावेळी संजय गायकवाड, शिवसेना  उपजिल्हाप्रमुख शांताराम दाणे, वसंतराव भोजने, संतोष लिप्ते, बाबुराव मोरे, राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख बळीराम मापारी, सुरेश वाळुकर, कपिल खेडेकर, भोजराज  पाटील, संतोष डिवरे, रविंद्र झाडोकार, विजय साठे, अनिल अंमलकार, दादाराव खार्डे, दिलीप वाघ, बाळासाहेब नारखेडे यांच्यासह जिल्ह्यातून तक्रारी घेवुन आलेले  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.