नदीखोलीकरण व ढाळीच्या बांधांमुळे शेतकर्यांची प्रगती साधली जाईल : आ.राहुलभाऊ बोंद्रे
गोदरी येथे विविध कामांचा आ.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ
बुलडाणा, दि. 27 - पाण्याची उपलब्धता आणि शेती सुधारणा या उत्तम शेतीसाठी आवश्यक गोष्टी आहे. त्यामुळे जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे कृषी विभागाच्या माध्यमातून ढाळीचे बांध बांधून पावसाचे पडणारे पाणी शेतातच आडवून, जिरवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण सदैव केला आहे. त्याच हेतूने मतदारसंघातील विविध ठिकाणी नाला खोलीकरण व शेती सुधारण्याची कामे राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गोदरी येथे प्रयत्नपुर्वक केल्या जाणार्या नदी खोलीकरणाचा शुभारंभ गावकर्यांना व या परीसरातील शेतकर्यांना प्रगतीकडे नेणारा ठरेल, असा विश्वास चिखली मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.तालुक्यातील येथे 8 लक्ष रूपये खर्चुन सिमेंंट नाला बांध खोलीकरण व 35 लक्ष रूपये किमतीचे ढाळीचे बांध करण्याच्या कामाचा आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
चिखली विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध व नदीखोलीकरण ही कामे कृषी विभागामार्फत मोठया प्रमाणावर सुरू आहे. ही कामे आपल्या मतदारसंघात वेगाने व्हावीत म्हणून स्थळ निश्चिती व या कामाचे मंजुरातीसाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी पूर्णपणे लक्ष घातले होते. आज 26 मे रोजी गोदरी येथे माजी बाजार समितीचे सभापती संजय पांढरे, जि.प.सदस्या सौ.ज्योतीताई खेडेकर, पंचायत समिती सदस्या वैशालीताई कर्हाडे, युवक कॉगे्रसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, चांधई सरपंच जनाबाई आत्माराम जाधव, पळसखेड दौलतचे सरपंच संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गोदरीचे सरपंच लक्ष्मीबाई शेळके, उपसरपंच अभिमन्यु कर्हाडे, विजय शेळके, ग्रा.प.सर्व सदस्य, महादेव भालेराव, संजय गिरी, ज्ञानेश्वर सोळंकी, संजय सोळंकी, नारायण बेरोड, खंडु उंबरकर, महादु घोलप, रामेश्वर मोळवंडे, नितीन मोळवंडे, गजानन राउत, रंगनाथ परीहार, पो.पा. राहुल साळवे, अर्जुन मोळवंडे, नंदु मोळवेंड, ग्रामसेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य, शाळा समिती अध्यक्ष सर्व सदस्य, कृषी पर्यवेक्षक के.एम.टाले, कृषी सहायक विलास शेळके, तलाठी तायडे, ग्रामसेवक परीहार, यांचेसह गावातील नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
