नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते धनादेश वाटप
बुलडाणा, दि. 27 - लोणार तालुक्यातील गावात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या लाभार्थ्याना तहसील कार्यालय लोणार यांचेकडून आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते वाटप धनादेश वाटप करण्यात आले.
यामध्ये तांबोळा येथील श्री लालमन धन्नू चौधरी यांचे दोन बैल वीज पडून 8 मे रोजी मृत झाले. त्यांना रु 50000/-चा धनादेश देण्यात आला, लोणार येथील भास्करराव साहेबराव घायाळ यांचे राहत्या घरास आग लागून 31 मार्च रोजी नुकसान झाले त्यांना रु. 3200/- चा धनादेश देण्यात आला, देऊळगाव वायसा येथील सुनिता प्रकाश चव्हाण यांच्या गोठ्याला 1 एप्रिल रोजी आग लागून दोन बैल मृत झाले त्यांना रु 50000/- चा धनादेश देण्यात आला, निजामपूर येथील संतोष ज्ञानबा जाधव व संजय ज्ञानबा जाधव यांच्या राहत्या घराला 9 मे रोजी आग लागून नुकसान झाले त्यांना प्रत्येकी रुपये 3200/-चा धनादेश देण्यात आला.
या सर्व घटनांमध्ये कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन आपत्तीग्रस्तांचे सांत्वन करून तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्रकरणे तयार करून घेऊन मंजुरात करून घेतले. व त्यांना तहसील कार्यालयात आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या हस्ते धनादेश वाटप केले. यावेळी, शिवसेना तालुका प्रमुख प्रा.बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक नंदकीशोर मापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवपाटील तेजनकर, जि. प. सदस्य राजेश मापारी, जि. प. सदस्यपती भगवानराव कोकाटे, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, मंडळ अधिकारी अनिल डव्हळे, तलाठी संतोष जाधव, संजय आटोळे, सुभाष कडाळे, भगवान सुलताने, राजेश शर्मा, प्रकाश अवसरमोल हजर होते.