वहागाव येथे बिबट्याचा वावर
कराड, दि. 14 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील वहागाव येथील गावाजवळ शेतात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वहागाव येथे गावाच्या पूर्वेकडील भागात गावाजवळच शेतकर्यांनी जनावरांचे शेड उभी केली आहेत. हा परिसर चार मोटचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या जनावरांबरोबरच अनेकांनी मेंढ्या पाळल्या आहेत. या ठिकाणी जोतिराम पवार, बाळासाहेब पवार, हौसेराव पवार यांचे शेळी पालनाचे शेड आहेत. या शेडपासून काही अंतरावर विहीर व शेतात जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्याचा उपयोग वहागाव परिसरातील शेतकरी, महिला, मजुर, मुले शेतात जाण्यासाठी करतात.
या रस्त्याने गावाकडे येताना राजेंद्र पवार व त्यांच्या मित्रांना शेळीपालन शेडजवळ बिबट्या बसलेला दिसला. परंतू, त्यांना वाटले की गावातील कुत्रे असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी त्याला दगड मारण्यास सुरूवात केली. मात्र हा प्राणी दगडांना न भिता त्यांच्या अंगावर चाल करून येऊ लागला. त्यावेळी हा प्राणी म्हणजे कुत्रा नसून बिबट्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर राजेंद्र पवार व त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा करून गावात धूम ठोकली. शेडवर बिबट्या आल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण त्यांना बिबट्या आढळून आला नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी संभाजी पवार हे त्या शेडजवळून जात असताना पुन्हा त्यांना त्या शेडजवळ दरवाजापाशी बिबट्या दिसला. अशाप्रकारे वहागाव ग्रामस्थांना बिबट्या 7 ते 8 वेळा दिसला. त्यामुळे वहागाव ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी रानात जाण्यास भीत आहेत. यानंतर वहागावच्या ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याची माहिती दिली. वनपाल येळवे आणि वनरक्षक निकम यांनी घटनास्थळाला भेट दिली.