आय.एम.आय.एम व महाराष्ट्र विकास आघाडीचे राठोड काँग्रेस पक्षात
लातूर, दि. 13 - लातूर शहर महानगरपालिका निवडणुक अंतिम टप्प्यात आली असताना लातूर शहरात काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन आघाडी (महाराष्ट्र विकास आघाडी, शेतकरी संघटना व ए.आय.एम.आय.एम.) चे प्रभाग क्रं. 16 मधील अधिकृत उमेदवार संजय देविदास राठोड यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
माजी मंत्री आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब व माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विाास ठेवून परिवर्तन आघाडी (महाराष्ट्र विकास आघाडी, शेतकरी संघटना व ए.आय.एम.आय.एम.) चे प्रभाग क्रं. 16 मधील अधिकृत उमेदवार संजय देविदास राठोड यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपण काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना निवडणुकीत जिंकुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या जाहीर पाठिंब्यासाठी प्रभाग क्रं. 16 चे काँग्रेस पक्ष निरीक्षक जितेंद्र स्वामी, सुंदर पाटील कव्हेकर, विद्याताई पाटील, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुर्यभान लांडगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी अमर कोकाटे, मनोज राठोड, सागर राठोड, रमेश राठोड, बालाजी गवळी, रमेश राठोड, अनिल मगर, अनिल जाधव आदी उपस्थित होते.