Breaking News

जाधव यांच्या सुटकेसाठी चिखली कॉगे्रस कमिटीने राबविली सहयाची मोहीम

बुलडाणा, दि. 14 - महाराष्ट्राचे सुपूत्र जाधव यांचेवर खोटे आरोप लावून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणारा अजब निर्णय पाकीस्तानने घेतला. त्याविरोधात भारत सरकारने आक्रमक धोरण स्विकारून श्री जधाव यांना भारतात परत आणन्यासाठी पाउले उचलावी. यासाठी चिखली तालुका व शहर कॉगे्रस कमिटीच्या वतीने सहयाची मोहीम राबविण्यात आली असून निवेदनावर हजारो लोकांच्या सहया होवून सदर निवेदन महाराष्ट्र सरकारकडे सोपविण्यासाठी चिखली तहसिलदार यांना आज दिनांक 13 एप्रिल 2017 रोजी देण्यात आले आहे. 
सदर निवेदनानुसार महाराष्ट्राचे सुपूत्र कुलभ्ाुषण जाधव यांच्यावर भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवून पाकीस्तान सरकारने त्यांना अटक करून पाकीस्तानच्या लष्करी न्यायालयात त्यांना फाशीची शिक्षा सुणावली. पाकीस्तानच्या लष्करी न्यायालयाचा हा निकाल मानवी हक्क आणी न्यायाच्या विरोधात आहेच, शिवाय सन 1963 च्या व्हिएन्ना कायदयाचाही भंग करणारा आहे. शिवाय पाकीस्तानी लष्करी कायदयात देहदंडाच्या शिक्षेची तरदुद नसतांनाही सगळे कायदे पायदळी तुडून पाकीस्तानी न्यायालयाने त्यांना फाशिची सजा सुणावली. यावर भारत सरकारने जी भ्ाुमीका घेतलेली आहे, त्याऐवजी सरकारने आक्रमक होवून नेमके व अधिक सक्रीय धोरण स्विकारावे व आंतर राष्ट्रीय दबाव आणून  जाधव यांना भारतात परत आणन्यासाठी पाउले उचलावी यासाठी महाराष्ट्र सरकारने जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडे पाठपूरावा करावा, अशी मागणी चिखली तालुका व शहर कॉगे्रस कमिटीच्या वतीने या निवेदना व्दारे करण्यात आली आहे.
संपुर्ण चिखली तालुक्यातील गावोगांव यासाठी सहयाची मोहिम राबवून नागरीकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. नागरीकांच्या स्वाक्षर्‍यासह हे निवेदन चिखली तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर, शहर अध्यख अतहरोद्यीन काझी, युवक कॉगे्रसचे तालुका अध्यक्ष रमेश सुरडकर, बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भ्ाुसारी, जि.प.सदस्य अशोकराव पडघान,  यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्याकर्त्यांच्या उपस्थितीत तहसिलदार यांना देण्यात आले.