Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे एक दिवसीय लाक्षणीक उपोषण

बुलडाणा, दि. 14 - जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी आज 13 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालींर बुधवत यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात शिवसैनिकासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बुधवत म्हणाले की, पेरल तर उगवत नाही, तर उगवल तर योग्य भावात विकल्या जात नाही. असा दुहेरी मारा सहन करणारा मायबाप शेतकरी आर्थिक विवचनात सापडला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे. यंदा चांगला पाऊस पडून बर्‍यापैकी उत्पादन झाले. परंतु नोट बंदीच्या निर्णयामुळे शेतमालाचे भाव पडले. परिणामी शेतकर्‍याच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून स्वामिनाथन आायोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, अन्यथा शिवेसना रस्त्यावरील लढा आणखी तीव्र करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यानंतर संजय गायकवाड, आशिष जाधव, उमेश कापुरे, दिपक सोनुने, अशोक इंगळे, लखन गाडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
या आंदोलनात पालीका उपाध्यक्ष विजय जायभाये, महिला आघाडीच्या सिंधुताई खेडेकर, राजू पवार, दिलीस सिनकर, नंदु कर्‍हाळे, भोजराज पाटील, शरद टेकाळे, माणिकराव सावळे, बाळू धुड, मधुकर महाले, वसंतराव डुकरे, विजय डुकरे, सुमंत इंगळे, विजय इतवारे, शेषराव सावळे, ज्ञानेश्‍वर गुळवे, मधुकर सिनकर, विजय गाढे, दिलीप माळोदे, सिमाराम जगताप, विशाल शिंबरे, दत्तात्रय टेकाळे, संजय धंदर, राहू सोनुने, कृष्णा धंदर, ज्ञानेश्‍वर तायडे, रफीक शहा, जीवनसिंग राजपुत, गजानन टेकाळे, अनिल जगताप, संदिप गावंडे, गजानन पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.