खेळाडूंनी कोणतेही अनावश्यक प्रोटीन सप्लिमेंट घेणे टाळावे : डॉ. अमोल पाटील
जळगाव, दि. 14 - अनेकदा व्यायाम करताना उत्तम शरीरयष्टी बनवण्यासाठी खेळाडूंतर्फे प्रोटीन सप्लिमेंट घेतले जाते. जीममध्ये अनेक प्रशिक्षक हे घेण्याचाही सल्ला देतात. पण सरसकट प्रोटीन घेऊ नये. ज्यांच्या शरीरात जन्मत:च काही त्रुटी आहेत अशांनाच हे घ्यावे लागते. आपल्या खेळाच्या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवून मगच निर्णय घ्यावा, असा सल्ला भारतीय महिला बॉक्सिंग संघाचे फिजीशियन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमोल पाटील यांनी दिला.
जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे गुरुवारी सकाळी ते दुपारी 12 वाजेदरम्यान कांताई सभागृहात खेळाडूंसाठी मोफत वैद्यकीय कार्यशाळा झाली. यात ‘आहार, प्रथमोपचार डोपिंग अॅण्ड सप्लिमेंट’ या विषयावर डॉ. अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुला मुलींना खेळाकडे वळवा, खेळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे करिअर असल्याचे सांगितले. गुडघे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनीष चौधरी ‘शालेय जीवनात खेळाडूंपुढे होणार्या दुखापतीची निगा कशी राखावी,’ याविषयावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी खेळाडूंनी खास करून लहान शालेय विद्यार्थ्यांनी खेळताना बूट योग्य प्रकारचे वापरावे, त्याचबरोबर सातत्य ठेवण्याचेही आवाहन केले. या वेळी अकॅडमीचे समन्वयक फारुख शेख, अरविंद देशपांडे, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, प्रशिक्षक सय्यद मोहसीन, प्रवीण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, पालकांची उपस्थिती होती.