Breaking News

हुंड्यामुळे आणखी एका शेतकर्‍याची आत्महत्या

लातूर, दि. 21 - एका मुलीने हुंड्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच हुंड्यामुळे आणखी एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अल्पभूधारक शेतकरी शिवराम बाळूराम सूर्यवंशी (45) यांनी आपल्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी हुंडा आणि खर्चाची जमवाजमव होऊ शकत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावातील ही घटना आहे.
मुलीचे लग्न ठरलं असताना हुंडा आणि लग्नाचा खर्च उचलण्यासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने शिवराम सुर्यवंशी यांच्यावर दडपण आले होते. शेवटी हात मोकळेच राहिल्याने शिवराम बाळूराम सूर्यवंशी यांनी आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी अत्महत्या केली.औराद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवराम सूर्यवंशी यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.