समाज आता जागा होतो आहे....!
दि. 26, एप्रिल - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु संतांचा हा महाराष्ट्र...छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अॅड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...
राजकारण आणि समाजकारण या अभ्यासाच्या पातळीवर दोन वेगवेगळ्या शाखा असल्या तरी व्यवस्था नामक नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुणा एका शाखेला बाजूला ठेवून व्यवस्थेला आकार येत नाही.किंबहूना अलिकडच्या काळात समाजकारण राजकारणावर आपले वर्चस्व सिध्द करीत असल्याचे चित्र आहे. नेमक्या याच वास्तवतेमुळे कथित समाज पुरूष सत्तेची दलाली करून समाजाचे लचके तोडू लागले आहेत.
समाज आणि राजकारण परस्परांना पुरक असायला हव. समाजाला वगळून राजकारण अशक्य आहे. एका दृष्टीने बदलत असलेल्या राजकारणाच्या स्वास्थासाठी समाजकारणाचे वाढते वर्चस्व स्वागतार्हच म्हणायला हवे. समाजकारण आपल्या भुमिकेशी शक्यतो प्रतारणा करताना दिसत नाही. नियमाला अपवाद असतात तसे समाजकारणात सक्रीय काही विचार शक्ती भुमिका बदलत असल्या तरी राजकारणाइतकी पातळी अद्याप सोडल्याचे उदाहरण नाही. समाजकारणाची सजगता राजकारणातील तत्व भ्रष्ट शक्तींच्या नाकात वेसण घालण्याचे धाडस म्हणूनच दाखवू शकते. भारतीय राजकारण आपल्या मुळ उद्देशापासून भरकटत आहे हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. या परिस्थितीला समाजात वावरत असलेले दलाल कारणीभूत आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या पायावर उभी असलेली आपल्या लोकशाहीची इमारत कोसळण्याची भिती वेळोवेळी व्यक्त केली जाते त्याचे कारण राजकारणाने स्वीकारलेला निर्लज्जपणा. हाच निर्लज्जपणा समाजाची दलाली करणार्या बाजारबुणग्यांच्या पथ्यावर पडला आहे, राजकारणातील निर्लज्जपणाला सत्तेचा सोस आहे. हवी ती किंमत मोजून हा सोस भागविला जातो, इथे बाजारबुणग्या दलालांची भूमिका अहंम असते.
समाजात कुठल्या तरी मुद्यावर मतभेद निर्माण करायचे. त्याला धुनी देत रहायचे. समाज मन पेटवायच.. वेगवेगळ्या समाजात तेढ वाढवायची आणि निवडणूक काळात हीच तेढ मतांमध्ये परावर्तीत करून घ्यायची. हा धंदा गेली वर्षभर सुरू असलेल्या विविध क्रांती मोर्चांमधून तेजीत दिसला. अनेकांनी या मोर्चांच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे, बहुजन जनता आता सुजाण झाली आहे, या दलालांचा बाजार उठविण्याची ताकद बहुजनांमध्ये आहे.