Breaking News

खा. गायकवाडांसंदर्भात एअर इंडियाचे दिल्ली पोलिसांना पत्र

नवी दिल्ली, दि. 20 - खासदार रवींद्र गायकवाड यांनी काही दिवसांपूर इंडियाच्या विमानात घातलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर एअर इंडियाने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवले आहे. एअर इंडियाच्या विमानात घातलेल्या गोंधळाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात काय कारवाई केली, असा थेट सवाल एअर इंडियाने विचारला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही, अशी विचारणाही या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच या कारवाईला विलंब होण्याची कारणे कोणती, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. यामुळे त्या विमानातील कर्मचार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.