महाराष्ट्र दिनापासून अकोल्याला निळवंडेचे पाणी मिळणार
अकोले, दि. 25 - अकोले शहरातील नागरिकांच्या सुविधा अन् विविध विकासकामे करण्यासाठी अकोले नगरपंचायत कटीबद्ध असून अनेक अडथळ्यांवर मात करीत नगरपंचायतने विकासकामे मार्गी लावली असून 1 मे महाराष्ट्र दिनी निळवंडे धरणाचे पाणी अकोलेकरांना थेट पाईपलाईनद्वारे मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष अॅड. धुमाळ, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम व नगरसेवकांनी ‘नगर विकास दिन’ निमित्ताने नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक बाळासाहेब वडजे, परशुराम शेळके, नामदेव पिचड, सचिन शेटे, विमल भोईर, सुरेश लोखंडे उपस्थित होते. पहिला नगर विकास दिन साजरा करीत असताना दि. 20 एप्रिल 2017 ते 30 एप्रिल 2017 या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
धुमाळ व निकम म्हणाले, अकोले शहरवासियांची प्रवरा नदीच्या किनार्यावर असणार्या अमरधाम परिसर विकासासाठी सुमारे 20 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. तसेच अगस्ती कारखाना रस्त्यालगतच्या आरसीसी गटारीसाठी 17 लक्ष रुपये, महालक्ष्मी कॉलनी अंतर्गंत आरसीसी गटारीसाठी 13 लक्ष, कोल्हार-घोटी रोड ते काजीपुरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे, गांधी चौक ते देवठाण रोडपर्यंत डांबरीकरण करणे 8 लक्ष रुपये, मुंदडा गल्ला ते चिरेबंदी पर्यंत रस्ता डांबरीकरण 5 लक्ष रुपये, देवठाण रोड ते प्रवरानदी पर्यंत रस्त्यालगत आरसीसी गटार बांधणे 9 लक्ष, तसेच शहरात 300 एलईडी लाईट बसविणे यासाठी नगरपंचायत फंडातून 22 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ही कामे सुरू करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र स्वच्छ अभियान अंतर्गंत शहरातील 680 पैकी 549 कुटुंबांना शौचालयासाठी प्रत्येक 17 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा पहिला हप्ता त्यांना देण्यात आला आहे, यासाठी जवळपास 1 कोटी रुपयांची तरतुद नगरपंचायतीने शासनाच्या व स्वनिधीतून केली आहे. सार्वजनिक शौचालय दुरूस्तीसाठी 4 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.
शहरातील नाले सफाई व दैनंदिन सफाईसाठी एक महिन्याच्या आतमध्ये एका संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून त्याच्यावर प्रक्रिया देखील करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. शहरात राज्य शासनाच्या नावावर असणार्या 192 जागा (भूखंड) नगरपंचायतीकडे वर्ग कराव्यात व या जागा विविध विकास कामांसाठी वापरता याव्यात, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. पर्यावरणपुरक असा प्रवरा नदीच्या किनार्यावर जाॉगिंग ट्रॅक करण्याचा नगरपंचायतीचा संकल्प असून नदीपात्रात असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधितांना नोटीसा दिल्या आहेत, त्यांनी अतिक्रमणे न काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. अकोले शहरात हागणदारी मुक्त अभियान राबविले जात आहे.
तसेच दरवर्षी पावसाळ्यात विश्रामगड कॉलनी, वृंदावन कॉलनी, मोरेश्वर कॉलनी, अगस्ती मंगल कार्यालय परिसर, दत्त कॉलनी हा सर्व परिसर पाण्यात असतो. यावर उपाययोजना म्हणून धुमाळवाडी कमान ते अकोले कोर्टपर्यंत भुयारी गटारीसाठी नगरोत्थान म्हणून 50 लक्ष मंजूर करण्यात आले असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
शहरातून जाणारा मुख्य रस्ता कोल्हार-घोटी रोड हा अकोले नगरपंचायतकडे वर्ग करावा, असा प्रस्ताव शासनाकडे नगरपंचायतीने जुलै 2016 मध्ये पाठविला आहे. परंतु याबाबत दारूबंदी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हा ठराव रद्द करावा अशी मागणी केली आहे. हा रस्ता वर्ग करणे अथवा हा प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला असून त्यामध्ये आम्ही आता कुठलाही फेरफार करू शकत नाही. परंतु कुठल्याही नवीन दारू दुकानाला ‘ना हरकत’ दाखला देणार नसल्याचे नगराध्यक्ष अॅड. धुमाळ यांनी सांगितले.