रेशन दुकानदारांवर पीओएस मशिनची सक्ती नको : पाटील
कराड, दि. 14 (प्रतिनिधी) : सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांवर शासनाने पीओएस मशिनची सक्ती करू नये, अशी मागणी ऑल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी पत्रकाद्वारे केलीे.
शासनाकडून येवू घातलेल्या पीओएस मशीन वापरताना राज्यात ग्रामीण भागात व शहरांमध्ये अडचणी येणार आहेत. अनेकदा वीज आणि इंटरनेटची सेवा सुरु नसते. अशा अडचणी असताना पीओएस मशिन वापरून धान्य वाटप करणे दुकानदारांना अडचणीचे होणार आहे. ही बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना शासकीय अधिकार्यांनी दुकानदारांना मशिन बसवण्याची सक्ती करू नये, अशा प्रकारे सक्ती केल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोकराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला.