Breaking News

अ‍ॅड.राठे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राण्यांसाठी पाणवठे

बुलडाणा, दि. 08 - निराधारांना आधार, भूकलेल्यांना अन्न आणि तहानलेल्याला पाणी देन्या इतके महान  सेवाकार्य दूसरे नाही. या उदांत विचारसरनीचे खंदे समर्थक राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या कीर्यप्रनालीला प्रमान मानून,  खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे  या विचारांना कृतीप्रवन करन्यासाठी, निस्वार्थ सेवाकार्याचा वसा घेतलेल्या आझाद हिंद संघटनेने  मूके प्राणी व निराधारांसाठी घेतलेला मदतीचा वसा मागील एकवीस वर्षांपासून अवीरत सूरू केला आहे.  मग निमीत्त कोनतेही असो ध्येय तेच, असेच अचैत्य आझाद हिंद चळवळीचे संस्थापक अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या वाढदिवसा निमीत्त  5 एप्रीलला पक्षांसाठी जंगलात पानवठे बसवीने, अनाथ, निराधारांना जिवनआवश्यक  वस्तूंचे वाटप करने, गरजू विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करने, महामानव विचार श्रूंखलेचे  5 एप्रील ते 14 एप्रील पर्यंन्त सात दिवशीय आयोजन करने, रक्तदान, अपंग निराधारांना व अनाथ आश्रमांना मदत भेट देउन समस्या जानून घेने अशा विविध सामाजीक उपक्रमांचे सकाळी 09 ते सायंकाळी 05 पर्यंन्त  एक दिवशीय आयोजन आझाद हिंद संघटनेच्या वतीने करन्यात आले होते . मानवतेच्या उंदातहेतूने आयोजीत सर्व उपक्रमांमध्ये परीसरातील नागरीकांनी स्वंयस्फृर्तीने सहभाग नोंदवत उपक्रमाचे स्वागत कौतूक केले.
सदर उपक्रमात आझाद हिंद चे सर्वश्री पदाधिकारी  सूरेखा निकाळजे, रवी भोंडे, योगेश कोकाटे, अक्षय तायडे, गनेश झामरे, प्रमीला सूशीर, शिला ईगळे, रंजना सपकाळ, समाधान ईंगळे, समा धनवे,आदेश कांडेलकर, ममता कोथळकर,  सोपान बिचारे, अजय टप, राहूल गोसावी, श्रीकृष्न भगत, ईमरान शेख, शालीकराम पाटील, नलीनी उन्हाळे, यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.