मिरा-भाईंदर महापालिकेतील 6 नगरसेवक शिवसेनेत
मुंबई, दि. 09 - मिरा-भाईंदर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कारण विद्यमान 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहा नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं. यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस-राष्ट्रावादीला हा मोठा झटका मानला जात आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक - रवींद्र माळी राष्ट्रवादी, वंदना चके राष्ट्रवादी, सुहास रकवी काँग्रेस, हरिश्चंद्र म्हात्रे काँग्रेस, सलीम शेख, काँग्रेस, अरुण कदम, मनसे जिल्हाध्यक्ष पालघर.
शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक - रवींद्र माळी राष्ट्रवादी, वंदना चके राष्ट्रवादी, सुहास रकवी काँग्रेस, हरिश्चंद्र म्हात्रे काँग्रेस, सलीम शेख, काँग्रेस, अरुण कदम, मनसे जिल्हाध्यक्ष पालघर.