मोबाईल वापरत ड्रायव्हिंग, नाशकात 40 वाहनचालकांवर कारवाई
नाशिक, दि. 07 - वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर आता सर्वोच्च न्यायालयाची नजर पडली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणार्या आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलणार्यांना आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कारण त्यांचा परवानाच निलंबित होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकमध्ये धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. नाशकात गेल्या 2 दिवसात 40 वाहन चालकांचे परवाने जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी चौघांचे परवाने 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
आम्ही आणि आरटीओनं ही कारवाई सुरु केली आहे. नियम मोडणार्या वाहनचालकांना बुधवारी आणि शनिवारी कार्यालयात बोलावलं जातं आणि सुनावणीनंतर निलंबनाची करण्यात येते, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं तसंच कानात हेडफोन लावून गाणी ऐकणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कॉलेजच्या तरुणांसह महिलांही इथं मागे नाहीत.