Breaking News

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

नवी दिल्ली, दि. 30 - मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’ प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना किती उत्सुकता होती, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिल्यावर लक्षात येतं. पहिल्याच दिवशी इतिहास रचत रेकॉर्ड ब्रेक कमाई ‘बाहुबली 2’ने केली आहे. बाहुबलीनं पहिल्याच दिवसात भारतात 121 कोटींची कमाई केली आहे. यात हिंदी 41 कोटी, तामिळ तेलुगु आणि मल्याळम 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. करण जोहरनं ट्विट करुन पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे ‘बाहुबली 2’ सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 201 कोटींचा गल्ला जमवला आहे.