रिलायन्स जिओला सहा महिन्यात 22.50 कोटींचा तोटा
मुंबई, दि. 26 - रिलायन्स जिओला मार्च 2017 पर्यंत म्हणजे गेल्या सहा महिन्यात 22.50 कोटी रुपये निव्वळ तोटा झाला आहे. एक वर्षापूर्वी जिओला या कालावधीत 7.46 कोटी रुपये तोटा झाला होता. मात्र गेल्या वर्षी 5 सप्टेंबरला मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंगची ऑफर सुरु केल्यानंतर या तोट्यात मोठी वाढ झाली आहे.
ऑक्टोबर 2016 ते मार्च 2017 या दरम्यान रिलायन्स जिओची एकूण कमाई 76 टक्क्यांनी कमी होऊन ती 50 लाखांवर आली. तर गेल्या वर्षी हा आकडा 2.25 कोटी रुपये होता. जिओने सलग प्रमोशनल ऑफर देत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ग्राहकांना मोफत सेवा दिली. जिओने 31 मार्चनंतर पेड सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा 15 दिवसांसाठी मोफत सेवा वाढवली. 5 सप्टेंबरला जिओ ऑफर लाँच केल्यानंतर कंपनीने 10 कोटींपेक्षा अधिक ग्राहक मिळवले आहेत. यापैकी 7.2 कोटींपेक्षाही अधिक ग्राहकांनी 99 रुपये देऊन प्राईम मेंबरशीप घेतली आहे.
जिओच्या डिजिटल सेवांमुळे भारत बदलण्यास मोठी मदत होणार आहे. मोफत सेवेचा वापर केलेले ग्राहकही पेड सेवकडे वळत आहेत. जिओ आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि नेटवर्क देण्यास बांधिल आहे, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. नुकत्याच संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात (2016-17) जिओला 31.37 कोटी रुपये निव्वळ तोटा झाला. तर 2015-16 या आर्थिक वर्षात हा तोटा 15.71 कोटी रुपये होता. दरम्यान जिओनी ‘धन धना धन‘ ऑफर अजूनही सुरुच आहे. जिओच्या ऑफर्समुळे दूरसंचार क्षेत्रात ऑफर्सची स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी स्वस्त ऑफर देत आहे.