पोटनिवडणूक 2017 : भाजपचा 10 पैकी 5, तर काँग्रेसचा 3 जागांवर विजय
मुंबई, दि. 14 - आठ राज्यातील दहा विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. पोटनिवडणुकीतही भाजपनेच बाजी मारल्याचं चित्र आहे. कारण दहापैकी 5 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने तीन जागा मिळवल्या. दिल्लीत राजौरी गार्डन जागेवर आप उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. मुख्य निवडणुकीत या जागेवर ‘आप’चा दणदणीत विजय झाला होता. मात्र आता भाजपचे मनजिंदर सिंह सिरसा यांनी विजय मिळवला आहे.
राज्यनिहाय निकाल - दिल्ली विधानसभा : दिल्ली विधानसभेच्या राजौरी गार्डन येथे भाजप उमेदवाराने 14 हजार 552 मतांनी विजय मिळवला. काँग्रेस या ठिकाणी दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला. तर अरविंद केजरीवाल यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं.
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील भोरंज या विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार अनिल धीमान यांनी 8 हजार 290 मतांनी विजय मिळवला. तर काँग्रेस या ठिकाणी दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
कर्नाटक : कर्नाटक विधानसभेच्या दोन्हीही जागेवर काँग्रेसच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. तर भाजप या ठिकाणी दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. इथे काँग्रेस आणि भाजपला समान यश मिळालं. अटेर या जागेवर काँग्रेसचे हेमंट कटारे यांचा 3 हजार 833 मतांनी विजय झाला. तर बांधवगड या जागेवर भाजपचे उमेदवार शिव नारायण सिंह यांचा 25 हजार 476 मतांनी विजय झाला. इथे काँग्रेस दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
राजस्थान : राजस्थानमधील धौलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने झेंडा फडकावला. भाजपच्या शोभा राणी कुशवाह यांनी 38 हजार 673 मतांनी विजय मिळवला.
पश्चिम बंगाल : सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने 42 हजार 425 मतांनी दणदणीत विजय मिळवला. भाजप या ठिकाणी दुसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
झारखंड : झारखंडच्या लिट्टी पाडा या विधानसभा जागेवर सत्ताधारी भाजपला धक्का बसला. जेएमएम या पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा 5 हजार 783 मतांनी पराभव केला.
आसाम : आसाममध्ये सत्ताधारी भाजपने धीमाजी या विधानसभेच्या जागेवर दणदणीत विजय मिळवला. रानोज पेगू यांनी काँग्रेस उमेदवाराचा 9 हजार 285 मतांनी पराभव केला.