Breaking News

महाराष्ट्रातील 18 कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 21 - केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 18 कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
येथील स्कोप कॉमप्लेक्सच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरात आले. यावेळी विविध श्रेणीत देशभरातील 43 संस्थांना सुवर्ण, रजत आणि कास्य करंडक व प्रशस्तीपत्र तसेच 27 संस्थांना प्रशस्तीपत्राने सन्मानीत करण्यात आले.
सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात कार्य करणार्‍या कंपन्यांना सर्वश्रेष्ठ पुरस्कार स्वरुपात देण्यात येणारे सुवर्ण करंडक व प्रशस्तीपत्र महाराष्ट्रातील भिवंडी येथील गोदरेज एण्ड बॉइस इलेक्ट्रॉनीक निर्मिती कंपनी लिमिटेडला प्रदान करण्यात आला.
रासायनिक वस्तू निर्मिती क्षेत्रासाठी सुरक्षा पुरस्काराचे रजत करंडक रायगड जिल्ह्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेड कंपनीला तसेच पालघर येथील एनपीसीआयएल तारापूर अणू उर्जा प्रकल्प केंद्र 3 व 4 ला उर्जा निर्मिती क्षेत्रातील श्रेष्ठ पुरस्कार स्वरूपात रजत करंडक व प्रशस्तीपत्र त्याचबरोबर याच श्रेणीत अभियांत्रिकी व सिमेंट विभागात पालघर जिल्ह्यातील वसई येथील रेचेम आरपीजी प्रा.ली. ला रजत करंडक व प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले.
खते व रसायने निर्मिती क्षेत्रात कार्य करणा-या कंपन्यांसाठी कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र स्वरूपात देण्यात येणारा सुरक्षा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील तळोजा येथील दिपक फर्टिलायझर्स एण्ड पेट्रोकेमीकल ला आणि पालघर येथील एनपीसीआयएल तारापूर अणू उर्जा प्रकल्प केंद्र 1 व 2 ला उर्जा निर्मिती क्षेत्रासाठी कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
बांधकाम क्षेत्रातील सुरक्षा पुरस्कारावर मुंबईतील मोनो रेल प्रकल्पात निर्मिती क्षेत्र सांभाळणारे एल एण्ड टी कंपनीने नाव कोरले कंपनीला पुरस्कार स्वरूपात कांस्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विक्रोळी(मुंबई) गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी, जेजुरी(पुणे) येथील हेंकल एडीसीव टेक्नॉलॉजी प्रा.लि., गणेखडपोली (रत्नागिरी) येथील क्रिश्‍ना एंटी ऑक्सीडंट प्रा.लि. आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांना सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील सुरक्षा कास्य करंडक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
निर्मिती क्षेत्रात डोंबिवली(ठाणे) येथील घरडा केमीकल्स लिमिटेड आणि सासनवाडी(पुणे) येथील प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड तसेच बांधकाम क्षेत्रात मुंबईतील वांद्रे येथील शापूरजी पाल्लनजी एण्ड कंपनी प्रा. लि. ला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रशस्तीपत्र पुरस्कार नवी मुंबईतील महापे येथील आरएमसी रेडीमिक्स सिमेंट लिमिटेड आणि मुंबईतील दहीसर येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी त्याचबरोबर वडगाव (पुणे) येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी व मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज एण्ड बॉइस निर्मिती कंपनी ला प्रदान करण्यात आले.