ठाणे पोलिसांनी 15 सराईत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!
ठाणे, दि. 21 - राज्यासह परराज्यात ज्वेलर्स आणि फायनान्स कंपन्यांची रेकी करून त्यावर दरोडा टाकणार्या अंतरराष्ट्रीय टोळीचे सराईत 15 आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणे पोलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणाहून तब्बल 15 सराईत घरफोडी करणार्यांना अटक केली. टोळीतील अटक असलेल्या आरोपींमध्ये झारखंड, नेपाळ आणि उत्तराखंड येथील आरोपींचा समावेश आहे.
ठाण्याच्या नौपाडा येथील मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून खबर्यांचा सापळा रचला. घोडबंदर रोडवरील चन्ना गावातील हॉटेल रॉयल हेरीटेजमधून आरोपी अब्दुल मजीद हसन शेख, उमर रज्जाक खातीब शेख, असुद्दिन कुर्शोड शेख या त्रिकुटाला नौपाडा येथून अटक केली. हे सर्व आरोपी झारखंड येथील राहणारे आहेत. पोलिसांच्या दुसर्या पथकाने घोडबंदरमधील चन्ना गावातीलच द्वारका हॉटेलमधून महमद जमील अख्तर अली, बरकत अबुल शेख, सेनाउल कुलास शेख त्रिकुटाला अटक केली. हेसुद्धा झारखंड येथील राहणारे आहेत.