Breaking News

1590 रु. चं डिजीटल पेमेंट, लातूरच्या मुलीला कोटीचं बक्षीस!

नागपूर, दि. 14 - डिजीधन योजनेअंतर्गत डिजीटल व्यवहार करणार्‍या भाग्यवान विजेत्यांची नावं आज जाहीर करण्यात आली.
लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षीसाची भाग्यवान विजेती ठरली. श्रद्धाने केवळ 1590 रुपयांचा डिजीटल व्यवहार केला होता. डिजीधन  योजनेअंतर्गत ती भाग्यवान ठरली. तर चिमन भाई प्रजापती ( गुजरात ) यांना 50 लाखाचं दुसरं आणि केवळ शंभर रुपयांचं डिजीटल पेमेंट करणारे भरत सिंह  (देहरादून) यांना  25 लाख रुपयांचं तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस मिळालं.