Breaking News

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरीत 10 आमदारांचं निलंबन मागे

मुंबई, दि 07 - अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला.
संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर तो मंजूरही करण्यात आला. यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले की, ‘विरोधी पक्षांच्या सूचनांवर विचार करुन सरकार काम करतं. त्यामुळे भविष्यात राज्यातील शेतकरी नक्की कर्जमुक्त करु. पण आपण लोकशाहीची परंपरा अबाधित ठेवली पाहिजे.’ असं म्हणत बापट यांनी आमदार निलंबनाचा रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला.