राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वाटप
नाशिक/प्रतिनिधी। 26 - राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत 41 लाभार्थी महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार डाॅ. सुरेश कोळी, नायब तहसीलदार गिरिष वाखारे, एस. पी. भादेकर, जगदिश निकम, ताराळकर आदी उपस्थित होते. कुटुंबातील कर्ता पुरुषाचे नैसर्गिक किँवा अपघाती निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या विधवा पत्नीस योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. योजनेच्या लाभासाठी मयत पुरुषाचे वय 59 वर्ष असावे आणि कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असावे. तसेच मृत्यूच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत संबंधीत तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयास प्रस्ताव सादर करावा लागतो.