Breaking News

विंचूर ग्रामपालिकेचा अजब कारभार महिलांना फसवून केला दारू दुकानाचा ठराव

विंचूर/प्रतिनिधी। 28 - येथील ग्रामपालीकेत कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी शरद पाटील  यांनी महीलांच्या फसवुन सह्या घेवुन देशी दारु दुकानास परवानगी दिली असा चुकीचा ठराव दिला असल्याची तक्रार सह्या करणार्‍या महींलानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
विंचुर ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य विभागाच्या आशा महीला तसेच ग्रामपंचायत महीला सदस्या 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी ग्रामपालिकेत हजेरीसाठी ग्रामपालिका रजिस्टरवर सह्या करतात. त्याप्रमाणे 26 जानेवारी 2016ला दोन रजिस्टरवरती सह्या घेण्यात आल्या. जानेवारी 25 रोजी महीला ग्रामसभा दाखवुन आम्हा महीलांची उपस्थिती दाखवुन आमच्या सह्या घेण्यात आल्या, प्रत्यक्ष त्या दिवशी महिला ग्रामसभा झालीच नाही. उपस्थिती म्हणुन सर्व महिलांनी  26 जानेवारीच्या रजिस्टरवर सह्या केल्या. 25 जाने रोजी सह्या केलेल्या रजिस्टर वर सर्व महीलांनी गावात देशी दारुच्या दुकानास परवानगी दिली  असा ठराव लिहुन घेतला व ठराव मंजुरही करण्यात आला. तसेच कित्येक अशिक्षित महीलांच्या घरी जावुन सह्या घेण्यात आल्या. 
आमच्या सर्व महीलांचा देशी दारुच्या दुकानास विरोध असुन ग्रामपालिकेने आमच्या समक्ष असा कोणताही ठराव मांडलेला नाही तसेच त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. याची शहानिशा करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात वैद्यकीय अधिक्षक एन.बी.गायकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली बैरागी, अंगणवाडी कार्यकर्त्या मनिषा जंगम, तुळसा राजगुरु, मंगल राऊत, रेखा कासने, रशिदा बागवान, रुपाली साळुंके, स्मिता काळे, कल्पना जाधव, मालीनी जोशी, अनिता क्षीरसागर, सुवर्णा दरेकर, शोभा पाटील, वैशाली बागले, संगिता साळी, मिनाक्षी मगर, वैशाली जाधव, उपसरपंच संगिता सोनवणे, ग्रा.सदस्या नंदिनी क्षीरसागर, ग्रा.सदस्या वंदना कानडे, आरोग्य विभागाच्या आशा महीला शोभा कपाळे,निता निकाळे आदींसह  इतर 43 महीलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.