महापौरपदी काँग्रेसचे हारुण शिकलगार तर उपमहापौरपदी विजय घाडगे यांची निवड
सांगली ः दि. 7 - महापौरपदी काँग्रेसचे हारुण शिकलगार तर उपमहापौरपदी विजय घाडगे यांची निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी, राजू गवळी, तसेच स्वाभिमानीच्या स्वरदा केळकर यांचा पराभव झाला.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी, राजू गवळी, स्वाभिमानीच्या स्वरदा केळकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नसल्याने जिल्हाधिकारी यांनी यावेळी मतदान घेतले. त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार शिकलगार व घाडगे यांनी 49 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना 23 मते, स्वाभिमानीच्या केळकर यांना 5 मते मिळाली. कालच काँग्रेसच्या बंडखोर निरंजन आवटी व प्रदिप पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. पण बंडखोरीमुळे पक्षातील गटबाजीच्या फायदा मिळेल या अंदाजामुळे राष्ट्रवादी व स्वाभिमानीने ही निवडणूक लढविली. निवड जाहीर होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी फटाक्याची
आतषबाजी करीत गुलाल उधळून करीत आनंद व्यक्त केला. श्री. शिकलगार व श्री. घाडगे यांची निवड झाल्यानंतर यावेळी त्यांच्या अभिनंदनाची सभा झाली.