Breaking News

कांदा पिकास हमीभाव द्या : शेतकर्‍यांची मागणी

 अहमदनगर । प्रतिनिधी । 24 - नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत कांद्याच्या बाजारभावात अचानक झालेल्या मोठया घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडला असून सर्व कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आज रोजी शेतकर्‍यांना एकरी कांदा उत्पादन करण्यास किमान 40 ते 50 हजार रुपये इतका खर्च येत आहे व एकरी मिळणारे उत्पादक 8 ते 9 टनापर्यंत मिळते. प्रति क्वीटंल 600 ते 700 रुपये बाजारभाव मिळाला तर त्याचा झालेला उत्पादन खर्चही मिळत नाही. त्यामुळे कांद्याच्या खर्चावर आधारित किमान 20 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संतोष वाडेकर, अनिल देठे, जगदिश गागरे, अमोल रोकडे, निलेश आरडे, महेश धाडगे, संकेत भोर, शरद पवळे, संदीप जाधव, संतोष गागरे, दत्ता वाडेकर, किशोर खाडे, राहुल पारधी, नारायण रोकडे, प्रविण भोर, शुभम टेकुडे, स्वप्नील पडवळ, अर्जुन चितळकर, पोपट दरेकर, काशिनाथ गोळे आदी शेतकरी उपस्थित होते. 
निवेदनात, शेतकर्‍यांचा कांद्याचा उत्पादन खर्चच वसुल होत नाही. मग तो त्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार ? कृषि पंपाचे वीज बिल, मुला मुलींचे शिक्षण व लग्न कार्यासाठी पैसा कोठून आणणार. मग शेवटचा पर्याय म्हणून बँका, पतसंस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो आणि काढलेले कर्ज परत करण्यासाठी कांद्यासारख्या नगदी पिकांवरच त्याला अवलंबून रहावे लागते. कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरणीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने शेतकर्‍याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे म्हटले आहे
नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत कांद्याच्या बाजारभावात अचानक झालेल्या मोठया घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडला असून सर्व कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आज रोजी शेतकर्‍यांना एकरी कांदा उत्पादन करण्यास किमान 40 ते 50 हजार रुपये इतका खर्च येत आहे व एकरी मिळणारे उत्पादक 8 ते 9 टनापर्यंत मिळते. प्रति क्वीटंल 600 ते 700 रुपये बाजारभाव मिळाला तर त्याचा झालेला उत्पादन खर्चही मिळत नाही. त्यामुळे कांद्याच्या खर्चावर आधारित किमान 20 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.