गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका - राष्ट्रपती
नवी दिल्ली, दि. 23 - गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखू नका असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
संसदेमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. राष्ट्रपतींनी सर्व खासदारांना परस्परांना सहकार्य करुन आपआपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. संसदेचे कामकाज सुरळीत चालू रहाण्यासाठी सरकारही प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले. या अधिवेशनात सरकार राज्यसभेत प्रलंबित असलेली12 आणि लोकसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करेल. उच्च शिक्षण संस्था, जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठ यावर उद्या चर्चा होणार आहे. राष्ट्रपतीं आपल्या भाषणात सरकारकडून नागरीकांच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि सरकारच्या यशस्वी कार्याची माहिती दिली.