Breaking News

’आप’च्या नेत्या सोनी सोरी यांच्यावर हल्ला

 छत्तीसगड, 21 -  येथील जगदलपूरमधील आम आदमी पक्षाच्या नेत्या सोनी सोरी यांच्या चेह़-यावर शनिवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या युवकांनी केमिकल फेकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांच्यावर गीदम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना राजधानीपासून 284 किमी अंतरावर घडली. 
शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जगदलपूरपासून 65 किलोमीटरवर असलेल्या गीदममधल्या घरी सोनी सोरी जात होत्या. त्यावेळी अज्ञात बाईकस्वारांनी चाकूच्या धाकाने त्यांचा रस्ता अडवून ज्वलनशील पदार्थ फेकला, अशी माहिती आपचे प्रदेश संयोजक डॉ. संकेत ठाकूर यांनी दिली आहे. सोनी सोरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याची शंका व्यक्त केली होती.