समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मुंबई, 23 - महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी समीर भुजबळांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण समीर भुजबळ यांच्या परवेश कंपनीमार्फत आणखी 30 कोटी रुपयांचे अनधिकृत ट्रान्सॅक्शन आढळून आले आहेत, ईडीने आज कोर्टाला ही माहिती दिली.
याआधारे तपास करुन ईडी आणखी एकाला अटक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती इडी सूत्रांनी दिली आहे. समीर भुजबळांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या सुनावणीच्या वेळी इडीने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड पत्रानुसार समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यातून जवळपास 870 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा माहिती इडीने कोर्टाला दिली होती. त्यापैकी 170 कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत.