Breaking News

विजय माल्याने कंपनी सोडण्यासाठी ५१५ कोटी

लंडन, 27  -   मद्यसम्राट विजय माल्याने युनायटेड स्पिरिट्समधून बाहेर पडण्यासाठी तडजोडीची किंमत म्हणून ७.५ कोटी डॉलर म्हणे ५१५ कोटी रूपये घेतले आहे. युनायटेड स्पिरिट्सची स्थापना माल्याच्या परिवाराने केली होती. याचे नियंत्रण डियाजिओच्या हातात आहे. 

या करारनुसार माल्या युनायटेड स्पिरिट्सच्या चेअरमन आणि गैर-कार्यकारी निदेशक पदाचा राजीनामा द्यावा. तसेच समुहातील इतर कंपन्याच्या संचालकपदांचा राजीनामा द्यावा. पण माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याच्या यूएसएल ग्रुप कंपनीच्या निदेशक मंडळात कायम राहिल. या कंपनीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल फ्रेंचायझी आहे.