पंतजली संस्थेला मिहानमध्ये 355 एकर जागा- गडकरी
नागपूर - 20 - योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली संस्थेला नागपूरच्या मिहानमध्ये 355 एकर जागा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे.अमरावती व गडचिरोली येथेही त्यांना जागा दिली जाणार आहे.
अमरावतीत फूडपार्क तर गडचिरोलीत जडीबुटींवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. पतंजली ट्रस्टचे प्रमुख आचार्य बाळकृष्ण शुक्रवारी नागपूरमध्ये आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बाळकृष्ण यांनी चर्चा केली. त्यानंतर अधिकार्यांसोबत बैठका झाल्यावर जागेबाबत अंतिम निर्णय झाला. त्यानंतर गडकरी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. गडचिरोलीत वनउपजावर आधारित औद्योगिक पार्क उभारण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून तेथे पतंजलीच्या जडीबुटी खरेदी केंद्राला जागा देण्यात येणार आहे, असे गडकरी म्हणाले. काटोलचा संत्रा प्रकल्प 500 कोटींचा असून दीड महिन्यात यासाठी जागा देण्यात येणार आहे
तर नागपूरच्या फूडपार्कमधील गुंतवणूक 2000 हजार कोटींची असणार आहे. विदर्भात शेतकर्यांच्या आत्महत्या मोठया प्रमाणात होत आहे, त्यासाठी पतंजलीने या भागात प्रक्रिया उद्योग सुरू करावे, अशी विनंती केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी बाबा रामदेव यांना केली होती. या विनंतीवरून पतंजलीने या भागात उद्योग उभारणीचा निर्णय घेतला आहे, असे आचार्य बाळकृ
ष्ण यांनी सांगितले. विदर्भात गत दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आहे, मात्र आतापर्यंत कधीच रामदेवबाबांना शेतकर्यांच्या दयनीय
अवस्थेची काळजी वाटली नाही. मात्र, आता सरकार बदलताच शेतकर्यांचे नाव पुढे करून बाबांनी व्यवसाय विस्तारासाठी विदर्भ निवडल्याची चर्चा
आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने आणि बाबांची या पक्षाशी जवळीक असल्याने सरकार त्यांच्यावर मेहरबान झाले आहे.