Breaking News

विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या फळे व सौंदर्य

निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. जर यांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्याच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास त्यापासून उपयोगच होणार असतो. रोज फळे खाताना आवडणारे त्याच प्रकारचे फळ न खाता ती जरा बदलून खावीत. त्यामुळे प्रत्येकात असलेले भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर उपवास केला असेल, तर नेहमीच तो फळे खाऊनच सोडावा. यामुळे पचनास मदत होते. तसेच जर अपचन, गॅसेस् इ. मुळे पोटास त्रास होत असेल, तर पोट व पचन पूर्ववत् करण्यासाठी 2-3 दिवस फलाहारच करावा.
आपल्या देशात सहज उपलब्ध असणार्‍या आणि मुबलक प्रमाणात मिळणार्‍या पुढील काही फळांची माहिती पुढे दिली आहे. आंबा - यास फळांचा राजा म्हणतात. यात अ, ब व क ही तीन जीवनसत्वे मुबलक असतात. पण हा प्रकृतीस उष्ण असल्याने खाण्याआधी काही काळ थंड पाण्यात बुडवून ठेवून खावा. उन्हाळ्यातील उष्म्याच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कच्चे पन्हे प्यावे किंवा ताज्या आंब्याच्या गराचा मँगो मिल्क शेक करून प्यावा. चेहर्‍याची त्वचा उजळावी यासाठी आंब्याचा गर, हळद दुधात, एकत्र कालवून चेहर्‍यावर चोळावे.
कैरी उकडून त्याचा गर चेहरा, गळा मान यावर चोळून घ्यावा व मग वाळल्यावर धुवावे. त्वचा मुलायम व कांतिमान बनेल.डाळिंब - पिकलेल्या डाळिंबाचे दाणे चेहर्‍यावर नियमितपणे चोळा, त्वचेचा रंग हलका व गुलबट होण्यास मद होईल. याचा प्रयोग ओठांवरही करावा. ओठांचा रंग सुधारण्यास मदत होईल. चेहर्‍यावरील डाग आणि झाकोळलेपणा घालविण्यासाठी डाळिंबांची स्वच्छ धुतलेली साल कच्च्या दुधात वाटा व चेहरा मान, गळा यावर लेपा, वाळल्यावर धुवा, सकाळी उठल्यावर नियमितपणे मधूर व रसाळ असे डाळिंबाचे दाणे चावून खा. त्यामुळे कोठा साफ राहतो. जर पोटात जंत असतील, तर तेही पडतील व आपोआप त्वचा उजळेल.
पपई - पुरातन कालापासून पिकलेल्या पपईचा गर हा एक प्राकृतीक आणि उपयुक्त सौंदर्य-प्रसाधन म्हणून करतात. कारण यात अ, ब, क ही जीवनसत्वे भरपूर असतात. तसेच यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस कार्बोहैड्रेटस् इ. चे प्रमाणही अधिक असते. याचा गर जर नियिमीतपणे चेहर्‍यावर चोळला तर त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यावरील डाग, पुरळ इ. कमी होतात. जर चेहरा व अन्य ठिकाणी मस असेल, तर त्यावर कच्च्या पपईचा गर चोळून लावावा. नियिमितपणा केल्यास मस जाऊ शकतील. चेहर्‍याचा रंग उजळावा आणि त्यावरील डाग कमी व्हावेत म्हणून अर्ध्या पपईचा रस काढावा त्यात गॉझ् भिजवावे व ते चेहर्‍यावर पसरावे. त्यावर पपईचा गर लेपावा, वाळू द्यावे. मग हे जिन्नस काढून चेहरा धुवावा. जर नवा जोडा चावला, तर त्यावर उतार पडावा यासाठी कच्च्या पपईचा रस काढून लावावा. चेहर्‍यास मसाज केल्यावर पिकलेल्या पपईचा गर फ्रुट पॅकप्रमाणे लेपावा. वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे त्वचा आकसली जाऊन कांती सुधारते. नारळाचे पाणी अनेक जीवनसत्वे व तत्सम घटकांनी युक्त असते. म्हणूनच जर हे नियमितपणे चेहर्‍यास लावले, तर त्यावरील डाग, राप इ. निघून येण्यास मदत होते.
केळे - या फळात भरपूर प्रमाणात अ, ब, क, द, ई, जी, व एच् ही जीवनसत्वे असतात. यात भरपूर स्टार्च व कार्बोहैड्रेटस् असतात. म्हणूनच केळे हे फळ आरोग्यवर्धक ठरते. अशक्त व कमी वजन असणार्‍या व्यक्तीने नियमितपणे केळी खावीत . प्रकृती सुधारून वजन वाढण्यास मदत होते. पिकलेल्या केळाच्या गरात मलई मिसळा व याचा पॅक चेहर्‍यावर लेपा. पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा यानंतर पिकलेल्या दुसर्‍या केळाच्या पातळ व गोल चकत्या कापून मधात (आधीच) बुडवून ठेवा व त्या सर्व चेहर्‍यावर ठेवा. यानंतर 15 मिनिटांनी चेहरा धुवा. त्वचा जर शुष्क असेल, तर हा उपाय केल्यास त्वचेचा कोरडेपणा जाऊन तिचे आरोग्य सुधारते.
जर चेहर्‍यावर फोड, पुटकळ्या असतील, तर त्यावर पिकलेल्या केळाचा गर चोळून घ्यावा. अर्धा तास ठेवावा व त्यानंतर कच्च्या दुधाने चेहरा धुवावा. नियमितपणे केल्यास फायदा होईल.
सफरचंद - मानवी आरोग्य आणि सौंदर्य या दोहोंचे जतन आणि वर्धन करायचे असेल , तर रोज एक तरी सफरचंद खावे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फाॅस्फरस, लोह, ईथर इ. उपयुक्त द्रव्ये असतात. याच्या सालातही खूप महत्वपूर्ण क्षार असतात. त्यामुळे हे अमृताप्रमाणेच मानावे. याखेरीज यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वेही असतात. सौंदर्य-वर्धनासाठी त्याचा पुढीलप्रमाणे उपयोग व्हावा. सफरचंदाच्या रसात थोडे गुलाबजलाचे थेंब टाका व चेहर्यास चोळा. सावळा रंग उजळविण्यास मदत होईल. चेहर्याच्या त्वचेचा वर्ण सुधारावा यासाठी सफरचंदाचा गर थोडा उकडा व चेहर्यावर चोळा. वाळला की चेहरा धुवा. नियमितपणे केल्यास फायदा होईल. जर केसातील कोंडा कमी करायचा असेल, तर प्रथम नेहमीप्रमाने केस धुवा. ओल्या केसांच्या मुळांच्या भांगा भांगातून ताज्या सफरचंदाचा रस चोळून लावा. 25-30 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवावेत. नियमितपणे हा उपाय करावा.खरबूज व टरबूज - ही फळे उन्हाळ्यातच उपलब्ध असतात. व त्यांचा उपयोग उन्हाळ्याचा त्रास कमी करून गारवा देण्यासाठी होत असतो. यांच्यात जलांश अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे ही फाळे कमी उष्मांकाची असतात. जर त्वचा शुष्क असेल, तर ती तैल व्हावी यासाठी खरबूजाच्या गरात एक अंड्याचे पाढरे व थोडी मिल्क पावडर कालवा व चेहर्यावर लेपा. वाळल्यावर धुवा. त्वचा जर चरचरीत व राठ वाटत असेल, तर ती नरम व्हावी यासाठी त्यावर खरबूजाचा गर चोळावा. सर्वांगावर टरबूजाची साल चोळावी. त्यामुळे त्वचा निखरून येते. संत्रे - या फळात मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असते हे रेशदार फळ असते. याचा गर, रस, साले या सर्वांचा उपयोग सौंदर्य-वर्धनासाठी होतो. याची ताजी साल नेहमी हात, पाय, चेहरा, यावर जरा चुरडून चोळावी. त्यांना ‘क’ जीवनसत्व मिळते. हात नरम व मुलायम करण्यासाठी याच्या ताज्या रसात थोडा मध मिसळावा व त्वचेवर चोळावा. तेलकट त्वचेस संत्र्याचा रस व मुलतानी माती यांच्या मिश्रणाचा पॅक लावावा.
केस धुण्यासाठी रिठा, शिकेकाई यांच्या पावडरीत सुकलेल्या संत्र्याची पूड घाला, उकळा गाळा. याने नियमितपणे केस धुवा म्हणजे ते काळेभोर, लांब व तजेलदार होतील. संत्र्याची साले उन्हात वाळवा वस्त्रगाळ पूड करून ती दूधात कालवा. मिश्रण एक जिन्नसी बनवा व हि पेस्ट चेहर्यावर लेपा. यामुळे तेलकट त्वचेचा आरोग्यास फायदा होईल आणि चेहर्याचा रंग उजळण्यासही मदत होईल. संत्र्याची साले मऊसर होईपर्यंत उकळा. मग हाताने त्याचा
पाण्यात चांगली कुस्करा. एका बादलीभर पाण्यात हे पाणी ओता व या सुगंधी आणि औषधी पाण्याने स्नान करा.