सरकारी बँक कर्मचारी संघटनांचा शुक्रवारी देशव्यापी संप
मुंबई, 7 - भारतीय स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण आणि करिअर प्रोग्रेशन स्कीमच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन‘ने दंड थोपटले आहेत. करिअर प्रोग्रेशन स्कीमला विरोध करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी शुक्रवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. तब्बल पाच लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने सरकारी बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणापूर्वी पाच सहयोगी बँकांच्या कर्मचार्यांनी करिअर प्रोग्रेशन स्कीमचा स्वीकार करावा, यासाठी स्टेट बँकेकडून दबाव टाकला जात आहे. याविरोधात कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचार्यांसाठी एकतर्फी सेवाशर्ती
लादणे अन्यायकारक आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.