Breaking News

स्त्री-पुरुष समानता वास्तवात नाही : पानसरे


 अहमदनगर । प्रतिनिधी । 07 -  स्त्रियांनी पुस्तकी शिक्षण पुष्कळ घेतले. पण, त्या शिक्षणाचा उपयोग स्वत: वरील अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी केला नाही. त्यामुळे सावित्रीच्या स्वप्नातील स्त्री-पुरुष समानता आजही वास्तवात येऊ शकलेली नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी व्यक्ते केले.
 न्यू आर्टस, कॉमर्स ण्ड सायन्स कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजच्या सहसचिव ड. दीपलक्ष्मी म्हसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खजिनदार रामचंद्र 
दरे, ड. रामनाथ वाघ, अरुणा काळे, निमाताई काटे, शोभा जाधव, उपप्राचार्य आर.जी. कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. सविता सकट यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व विचारावर आधारीत गीत कार्यक्रमाच्या सुरूवातीला सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनंदा शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रा. अर्चना रोहोकले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संध्या जाधव यांनी आभार मानले.