भारतीय संघाने संघाने ट्वेंटी-20 तीनही सामने जिंक ले
सिडनी - एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हॉईटवॉश टाळण्याचा प्रयत्न करून त्यात यश मिळविणार्या भारतीय संघाने ट्वेंटी-20 सामन्यात मात्र तीनही सामने जिंकून ऑस्ट्रेलियालाच व्हॉईटवॉश देऊन गर्वहरण‘ केले आहे. ऑस्ट्रेलियाने शेन वॉट्सनच्या नाबाद 124 धावांच्या बळावर भारतासबोर तब्बल 198 धावांचे लक्ष्य ठेवले असताना भारताने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे तब्बल 140 वर्षांनी तीन किंवा तीनपेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाली आहे.
198 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. शिखर धवनने अवघ्या 9 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकरांच्या मदतीने 26 धावा जोडून आत्मविश्वास बळकट करून दिला. त्यानंतर विराट कोहली (36 चेंडू 50 धावा) आणि रोहित शर्माने (38 चेंडू 52 धावा) संयमी खेळ करत 78 धावांची भागीदारी करून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानेही धडाकेबाज खेळ करत 25 चेंडूत 49 धावा करून डावाला पुढे नेले. तर युवराज सिंगनेही (12 चेंडू 15 धावा) जोडून सुरेश रैनाच्या सहकार्याने विजयश्री खेचून आणली.
तत्पूर्वी आज सकाळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार शेन वॉट्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत झळकाविलेल्या शतकामुळे (नाबाद 124) ऑस्ट्रेलियाने तिसर्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 198 धावांचे अवघड आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाचे उस्मान ख्वाजा आणि वॉट्सन यांनी डावाची सुरवात केली. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच षटकात 14 धावा करत ऑस्ट्रेलियाने आक्रमकपणाची चुणूक दाखविली. पण, नेहराने आपल्या दुसर्या षटकात ख्वाजाला 14 धावांवर बाद केले. वॉट्सनने आपली आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवत शॉन मार्शच्या साथीने दुसर्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी नोंदविली. अश्विनने मार्शला त्रिफळाबाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यापाठोपाठ मॅक्सवेल पुन्हा एकदा युवराजचा शिकार ठरला. मात्र, वॉट्सनने ट्रॅव्हिसच्या हेडच्या साथीने धावांची गती कायम ठेवताना चौफेर फटकेबाजी केली. अखेर त्याने 60 चेंडूत 10 चौकार व चार षटकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण केले. त्याला कोहलीने सोपे जीवदान दिले. वॉट्सनने अखेरपर्यंत फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. अखेर वॉट्सन 124 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 197 धावा केल्या. ट्वेंटी-20 मालिकेत धवल यश संपादन करण्यासाठी भारताचा विजयाचा निर्धार आहे. क्रिकेटच्या खेळात परदेश दौर्यावर जाऊन यश मिळवले की वेगळा आनंद होतो.