Breaking News

आंबडच्या अंबिका माध्यमिक विद्यालयात मानसी कानवडे प्रथम


मेहेंदुरी / प्रतिनिधी 
अकोले तालुक्यातील आंबड येथील अंबिका माध्यमिक विद्यालयाचा निकाल लागला. आंबड शाळेचा निकाल-80.48 टक्के लागला असून, त्यामध्ये प्रथम क्रमांक मानसी सुधिर कानवडे 87 टक्के, तर द्वितीय क्रमांक प्राजक्ता बाळासाहेब भोर 82 टक्के तसेच तृतिय क्रमांक ऋषिकेश सुनिल कानवडे 78 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बी.के नवले, भोर डी. ए. जाधव आर. टी. सय्यद आय. सी, लोटे. के.के, लावरे के.बी.देशमुख एम.जे, अण्णासाहेब कानवड, संजय कोल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले. गावच्या वतीने संस्थापक गिरजाजी जाधव, सचिव भागवत भोर, संस्थेचे पदाधिकारी, आंबड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहिदास जाधव सर्व सदस्य पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे अभिनंदन करून आभार मानले.