Breaking News

परप्रांतातील 10 लाखांची दारू जप्त, दोघांना अटक


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने केलेल्या कारवाईत खांबाडा ते वाठोडा मार्गावर अवैध दारु विक्री करणा-या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका परिसरात खांबाडा ते वाठोडा मार्गावर अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याची माहिती विभागीय भरारी पथकास प्राप्त झाली. विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक डी. एस. जानराव यांनी परिसरात कारवाई करीत चारचाकी व दुचाकी वाहन,मध्यप्रदेशात निर्मित 55 पेट्या दारु जप्त केली. जप्त मालाची किंमत 10 लक्ष 21 हजार 400 रुपये आहे. याशिवाय घटनास्थळी उपस्थित शेखर प्रमोद घोडे, किसन पतरु नैताम या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैध दारु विक्री करणारा मुख्य अंजनेयल्ले एस. जंगोनी घटनास्थळावरून फरार झाला आहे.