शेतकऱयांच्या मागण्या मान्य करा : आ. डॉ. तांबे
संगमनेर प्रतिनिधी
शेतकर्यांचे नेते माजी कृषीमंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने देशभरात विविध संघटनांच्यावतीने सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असून शेतकर्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.
संगमनेर प्रांत कार्यालयात तालुका काँग्रेसच्यावतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, तालुका अध्यक्ष बाबा ओहळ, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, निशा कोकणे, रामदास वाघ, शिवाजी थोरात, नवनाथ आरगडे, भाऊसाहेब कुटे, आर. बी. राहणे, लक्ष्मणराव कुटे, शंकराव खेमनर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, नितीन अभंग, रामहरी कातोरे, किसान क्रांतीचे समन्वयक सतीष कानवडे, प्रा. बाबा खरात आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी निवेदन स्विकारले.
यावेळी बोलतांना आ. डॉ. तांबे म्हणाले, भाजपा सरकार हे थापाडे सरकार आहे. कोणते ही विकासाचे ठोस काम नाही. फक्त जाहिरात बाजी हेच या सरकारचे वैशिष्टे आहे. शेतकर्यांच्या प्रश्न सोडवण्यास वेळ नाही. कर्जमाफीच्या नावावर शेतकर्यांची मोठी चेष्ठा चालवली आहे. शेती व्यवसाय मोठा अडचणीत असतांना सरकार श्रीमंत व उद्योगपतींना मदत करत आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘शेतकरी बचाव देश बचाव’ अशा घोषणा दिल्या. यावेळी शहरातील युवक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित हजर होते.
**