Breaking News

हॉटेलच्या बिलावरुन वाद ; ग्राहकास बेदम मारहाण


अहमदनगर - बालासुब्रंमन्यंम व्यंकटपती नायडु आणि त्याचे मित्र हे एका हॉटेलमध्ये जेवनाकरता गेल असता जेवन झाल्यावर तेथील वेटने जेवनाचे बील दिले त्यात सोडा बाटलीची किंमत 18 रुपये असुन 45 रुपये का लावले असे विचारल्याने, तुम्ही बिल पेड करा असे म्हणुन अनोळखी चार ते पाच जणांनी एकत्र येवुन त्यांना मारहाण केली.या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटुन गहाळ झाली आहे. तसेच फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला मार लागला आहे. यावरुन भादवि 143,324,323, 504, 506, 427 बी.पी.अ‍ॅक्ट 37 (1) 135 प्रमाणे भिंगार कॅम्पला नोंद करण्यात आली आहे.