Breaking News

रणजीपटू अभिषेक डोपिंगमध्ये दोषी


मुंबई

पदार्पणातच द्विशतक झळकावणारा पंजाबचा रणजीपटू अभिषेक गुप्ता बीसीसीआयने घेतलेल्या डोपिंग चाचणीत दोषी आढळला आहे. दरम्यान, चाचणीत दोषीआढळल्यानंतर बीसीसीआयकडून त्याच्यावर ८ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.एका स्थानिक टी२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने ही चाचणी घेतलीहोती. त्यानुसार १५ जानेवारी रोजी अभिषेकने आपले युरीन सॅम्पल चाचणी घेणाऱ्या समितीकडे दिले. या नमुन्यात टर्ब्युटलाईन या उत्तेजक द्रव्याचे त्याने सेवनकेले असल्याचे चाचणीदरम्यान दिसून आले. ‘वाडा’च्या यादीत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीआहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली. . त्याने त्या सामन्यात २०२ धावा केल्या होत्या. दरम्यान, त्याच्या निलंबनाचा कालावधी १४ सप्टेंबर २०१८ पर्यंतअसणार आहे. अशाच प्रकारच्या उत्तेजक द्रव्य सेवनामुळे युसूफ पठाणावरही बंदी घालण्यात आली होती.