मंत्रालयात काँक्रीटीकरणाचा बनाव; चोवीस लाखाच्या निधीची विल्हेवाट
मंत्रालयातील अदृश्य पेव्हर ब्लॉक प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू होऊन चौकशीचे संकेत मिळत असतानाच मंत्रालयाच्या काँक्रीटीकरणावर नव्याने काँक्रीटीकरण केल्याचा बनाव चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालिन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या नावावर हे दोन्ही पराक्रम नोंदले गेले आहेत. पेव्हर ब्लॉक प्रकरणाची चौकशी दृष्टीपथात असताना मंत्रालयाचे बनावट काँक्रीटीकरणाचे नवे झेंगाट रणजीत हांडे यांना अडचणीत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नक्की काय चालले आहे, हा विभाग सार्वजनिक विकासासाठी कार्यरत आहे की या विभागातील अभियंत्यांच्या स्वउध्दारासाठी? असा प्रश्न निर्माण व्हावा, या धर्तीवर या विभागाचे काम सर्वदुर सुरू आहे. महाराष्ट्राच्या निम शहरी आणि ग्रामिण भागात सुरू असलेल्या कामात होत असलेली अनियमितता एक वेळ दुर्लक्षित होऊ शकते. पण राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय इमारत आणि परिसरात पाच वर्षात झालेल्या कामातही शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोट्यावधी रूपयांचा अपहार केल्याचे विविध चौकशीमधून सिध्द झाले आहे.
काही प्रकरणे नव्याने उघडकीस येत असून सन 2015 मध्ये मंत्रालय परिसरात कागदावर बसविले गेलेले पेव्हर ब्लॉक आणि मंत्रालयात न झालेले काँक्रीटीकरण सध्या चर्चेत आहेत. शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांनी या दोन्ही कामांमध्ये पन्नास लाखांचा अपहार केला अशी चर्चा आहे. 15 ऑगस्ट 2015 या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी मंत्रालयाच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रस्तावित करून कार्यकारी अभियंता सी. बी. पाटील यांनी डिसेंबर 2014 मध्ये कार्यारंभ आदेश काढले होते. त्यानंतर त्यांची बदली होऊन मार्च 2015 रणजीत हांडे यांनी शहर इलाखाचा कार्यभार स्वीकारला. पाटील यांनी प्रस्तावित केलेल्या कार्यारंभ आदेशाप्रमाणे पेव्हर ब्लॉक बसविले गेलेत की नाही याची शहनिशा न करताच रणजीत हांडे यांनी कंत्राटदारांना देयके अदा केली. प्रत्यक्षात प्रस्तावित ठिकाणी एकही पेव्हर ब्लॉक बसविले गेले नाहीत. ही बाब उघड झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या कामाची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे. या वृत्ताची शाई सुकते ना सुकते तोच रणजीत हांडे यांच्याच कार्यकाळातील मंत्रालय काँक्रीटीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. किशोर पाटील आणि सी. बी. पाटील यांच्या कार्यकाळात मंत्रालयात युनिटी कन्स्ट्रक्शन या कंपनीने काँक्रीटीकरण केले होते. त्याच काँक्रीटीकरणावर रणजीत हांडे यांनी 24 लाखाचा निधी खर्च झाल्याचे दाखविले आहे. या कामाच्या तीन लाखाचे आठ तुकडे करून रणजीत हांडे यांनी कामांचे वाटप करून काम झाल्याचे दाखवले आणि 24 लाखाची देयके त्या आठ कंत्राटदारांच्या नावाने अदा केले. मोठ्या कामांचे तुकडे पाडतांना ई- निविदा प्रसिध्द करणे क्रमप्राप्त असताना हांडे यांनी आपल्या आपल्या अधिकारात कामांचे बेकायदेशीर वाटप केले. आणि काँक्रीटीकरण न करताच चोवीस लाखाची देयकेही काढली.पेव्हर ब्लॉकचे 24 आणि काँक्रीटीकरणाचे 24 लाख असा 50 लाखांचा अपहार रणजीत हांडे यांच्या नावावर आजमितीस नोंदला गेला आहे.
जनक हांडे,
पालक वाळके
मंत्रालयातील काँक्रीटीकरणाचा बनाव करून केलेल्या चोवीस लाखाच्या अपहाराचे जनक रणजीत हांडे जनक आहेत.तर या न झालेल्या काँक्रिटीकरणाची देयके मंजूर करून अदा करणाचे कर्तव्य प्रज्ञा वाळके यांनी पार पाडल्याने हा अपहार पोसण्यात प्रज्ञा वाळके यांचाही हातभार लागल्याची चर्चा आहे.