नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीच्या राजकारणात एंट्री केली. राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी मराठीतून तर राणेंनी हिंदीतून शपथ घेतली. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे महाराष्ट्रातून नियुक्त करण्यात आलेल्या 6 राज्यसभा खासदारांना मंगळवारी शपथ देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली. नारायण राणे यांनी हिंदीतून शपथ घेतली. अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांनी मराठीबाणा राखत मराठीतून शपथ घेतली.काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवले. कुमार केतकर यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.
राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:45
Rating: 5