महिला संरक्षण समित्यांची स्थापना करण्याची आपच्या कार्यकर्त्यांची मागणी
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महिलांवरील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कृतीशील कारवाई करण्यासंबंधी योजना उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. के वळ महिला अत्याचाराच्या घटनांचा पंचनामा करणे हे पोलिसांचे काम नसून घटना घडण्याअगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे.महाराष्ट्रातील शेकडो स्वयंसेवकांसह आपच्या नेत्यांनी ब्रिगेडियर सुधीर सावंत, देवेंद्र वानखेडे, धनंजय शिंदे, किशोर मंधन यांसह त्यांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना भेट देऊन संबंधित अधिक ार्यांना निवेदन दिले.