पारनेर ग्रामीण रुग्णालयात तरुणांचा धिंगाणा चार जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील रेनवडी या गावातील फीर्यादी सुंबाबाई रामभाउ येवले यांनी पाेलीस स्टेशनला फीर्याद दिली आहे की, रेनवडी गावातील आरोपी सोमनाथ बाबाजी येवले, पुनम सोमनाथ येवले, प्रकाश बाबाजी येवले, भामाबाई बाबाजी येवले,यांनी शुक्रवार दि २ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान रेनवडी शिवारातील शेती गट नंबर ५२१ मधील शेती जमिनीच्या वादावरुन नांगरणी करीत असताना लाथा, बुक्की व शिविगाळ करत काठीने मारहाण केली. म्हणुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे फिर्यादी व त्यांचे नातेवाईक मारहाण झाल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, रितसर वैद्यकिय अधिकारी यांनी त्याच्या जखमेवर उपचार करुन त्या प्रमाणे प्रमाणपञ दिले. त्यातवेळेस आरोपीचे नातेवाईकही रुग्णालयात आले. फिर्यादीचे नातेवाईक सुहास ञानदेव औटी, नानाभाउ पोटे, व तुषार येवले या तरुणांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन रुग्णालयात धिंगाणा घालण्यास सुरवात केली. फिर्यादी नातेवाईकांचे म्हणणे होते की, रामभाउ तुकाराम येवले, ञषिकेश रामभाउ येवले, सुबाबाई रामभाउ येवले यांना मारहाणीत जखम झाल्याने सेवेत असलेल्या डॉ. अभिलाषा शिंदे यांना विचारणा केली असता की, या लोकांना जबर जखम असताना साधी जखम असल्याचे प्रमाणपञ का दिले. या कारणांवरुन हुज्जत घालण्यास सुरवात केली. या वादावादीने आरोपीनी वैद्यकिय अधिकारी व स्टाफ ला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या आरोपींवर गुन्हा रजि नंबर ५६/१८ व त्याच्यावर आय पी सी प्रमाणे ३५३, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ व क्रिमिलेयर लॉ अँक्ट ७ नुसार पारनेर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुहास ञानदेव औटी याला अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास पो. उपनिरिक्षक आर. डी. पवार हे करत आहेत.