Breaking News

कोपरगाव तालुक्यासाठी १ हजार ०७१ घरकुले मंजूर : होन


कोपरगाव ता. प्रतिनिधी -  तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या सभापती व सदस्यांना सूचना केल्या होत्या. त्यादृष्टीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यासाठी १ हजार ०७१ घरकुले मंजूर झाली, अशी माहिती सभापती अनुसया होन यांनी दिली.

त्या म्हणाल्या, की युवानेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम सुरु आहे. वंचितांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. त्या पार्श्वभूमीवर सन २०१७ / १८ या वर्षांत शबरी आवास योजना, माता रमाई घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांच्या माध्यमातून कोपरगाव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या डीआरडीए विभागाकडे पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यामध्ये शबरी आवास योजनेचि ५३ घरकुले, माता रमाई घरकुल योजना ४३१, प्रधानमंत्री आवास योजना – ५८७ घरकुले कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आली. येत्या २०१८ / १९ या आर्थिक वर्षांत ग्रामीण विकास यंत्रणेकडून जास्तीत जास्त घरकुले मंजूर करून आणण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य प्रयत्नशील असणार आहेत. दरम्यान, मंजूर करण्यात आलेली सर्व घरकुले लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व सदस्य स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे सभापत होन यांनी सांगितले.